मराठवाड्यातील महत्त्वाच्या व्यक्ती आयसिसच्या टार्गेटवर
मराठवाड्यातल्या राजकीय आणि महत्त्वाच्या व्यक्ती तसंच मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठे सण नासीर चाऊस आणि शाहीद खान यांच्या टार्गेटवर होते. विशेष म्हणजे कार रिमोटच्या चावीचा वापर करून स्फोटकांनी भरलेली कार उडवून घातपात करण्याचा या दोघांचा प्लॅन होता. यासाठी आयसीसने एक मोठी टीम तयार केल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीतून पुढे आलंय.
परभणी : मराठवाड्यातल्या राजकीय आणि महत्त्वाच्या व्यक्ती तसंच मुंबई पुण्यासारख्या शहरातील मोठे सण नासीर चाऊस आणि शाहीद खान यांच्या टार्गेटवर होते. विशेष म्हणजे कार रिमोटच्या चावीचा वापर करून स्फोटकांनी भरलेली कार उडवून घातपात करण्याचा या दोघांचा प्लॅन होता. यासाठी आयसीसने एक मोठी टीम तयार केल्याचं सुत्रांनी दिलेल्या माहितीतून पुढे आलंय.
मराठवाड्यातले राजकीय नेते किंवा त्या महत्त्वाच्या व्यक्ती कोण याचा शोध आता एटीएसतर्फे घेतला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे नासीर आणि शाहीदला अटक झाली असली त्यांच्या टीममध्ये आणखी सात ते आठ तरूण असल्याचं समजतंय. या सर्वांना सीरियातल्या आयसीसच्या कमांडरने बॉम्ब बनवण्याचं आणि टार्गेटला उडवण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. या सर्वांवर स्वतंत्र कामगिरी सोपवण्यात आलीय. त्यामुळे मराठवाड्यातील राजकीय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेकडे एटीएसने राज्य सरकारचं लक्ष वेधलं आहे.