नागपूर :  शहरातील अजनी चौकात बुधवारी अनोखं दृश्य पाहायला मिळाले. काँग्रेस नेते नारायण राणे यांचा निषेध करण्याकरिता, भाजप नेते जमले होते. यावेळी राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. मात्र, किरकोळ कारणावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्येच  फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधान परिषदेमध्ये भाषणा दरम्यान नारायण राणेंनी, मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करत, स्थानिक भाजप नेत्यांनी निषेध आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाली. क्षुल्लक कारणावरुन भाजपचे दोन स्थानिक नेते आपसात भिडले. आणि काही समजण्याच्या आधीच दोघांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. 


काही काळ चाललेल्या या मारामारीनंतर इतरांनी मध्यस्ती करत, त्यांचे हे भांडण थांबवले. मात्र तोपर्यंत या दोघांनी बघ्यांचे चांगलंच मनोरंजन केले. दिवसभर शहरात याचीच चर्चा होती.