कल्याण : ठाण्यात, विलेपार्ल्यात शिवसैनिकाने केलेल्या मारहाणीचे प्रकार ताजे असतानाच आता कल्याणमध्ये आणखी एका बड्या भाजप नेत्याचा पराक्रम गाजतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कडोंमपाचे उपमहापौर विक्रम तरे यांनी नगरसेविका असलेल्या पत्नीला मारहाण केल्याचं समोर आलंय. तरे यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप त्यांची नगरसेविका असलेल्या पत्नी मोनिका तरे यांनी केलाय. 


या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी मोनिका तरे आल्या होत्या. मात्र नंतर त्यांचा थांगपत्ता लागत नाहीय. त्यांचे दोन्ही मोबाईल बंद आहेत. 


मात्र, मोनिका तरे यांनी केलेले सर्व आरोप विक्रम तरे यांनी फेटाळून लावले आहेत. घरगुती वाद झाल्यावर आपण घराबाहेर गेलो. कोणतीही मारहाण केली नाही असं विक्रम तरे यांनी म्हटलंय.