प्रशांत परदेशी , धुळे : खान्देशातील नगरपालिका निवडणूक निकाल भाजपाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता देणारे ठरले असले तरी या निकालांनी भाजपाला एक नवा मतदार मिळाल्याचं दिसून आला आहे. खान्देशातील पालिका निवडणुकीत भाजपाला विक्रमी अशी मुस्लिम समाजाची मत मिळली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील भाजपच्या कमळावर पाच मुस्लिम समाजातील लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. विशेष म्हणजे मुस्लिम समाजाने यावेळी शिरपूर पालिका वगळता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पर्याय नाकारला असल्याचं दिसत. 


खान्देशातील जळगाव जिल्ह्याती १२ नगरपालिका आणि एक नगर  पंचायत, धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा पालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. खान्देशात भाजपचे ११६ नगरसेवक निवडणून आले आहेत तर नऊ ठिकाणी नगराध्यक्ष पदी भाजप विराजमान झाली आहे. भाजपचं खान्देशातील हे यश गेल्या निवडवणुकीच्या तुलनेत कुठे दुप्पट तर कुठे तिप्पट आहे. या यशापेक्ष भाजपासाठी एक मोठी दिलासादायक घटना या निवडणुकीत घडली आहे. 


मुस्लिम समाजातील मतदाराने भाजपवर विश्वास ठेवलीच चित्र या निवडणुकीत समोर आलं आहे. एकट्या दोंडाईचा पालिकेत भाजपाला सात हजारापेक्षा जास्त मत मुस्लिम समाजातील मतदारांची मिळाली आहेत. या पालिकेत सुफियान तडवी , अफरिन बागवान , नबु पिंजारी आणि सईदा पिंजारी हे चार नगरसेवक भाजपच्या तिकिटावर निवडणून आले आहेत. येथे नगराध्यक्ष पदासाठीही मुस्लिम मतदारांनी भाजपाला पसंदी दिली आहे. 


विशेष म्हणजे मुस्लिम मतदारांनी खान्देशात अपवाद वगळता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं दिसत नाही. या मतदारांनी भले भाजपाला मत दिली नसतील मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला हि मत दिलेली नाहीत, या पक्षां व्यतिरिक्त मतदान या समाजाने केले आहे.  इतर पक्षाकडून भ्रमनिरास झालेल्या या समाजाला , भाजपचं विकासाचा मुद्दा तुलनेने आकर्षित करत असल्याचं जाणकार सांगतात. 


खान्देशातील हक्काचा मुस्लिम मतदार आता आपलं भलं बुर चांगल्या पद्धतीने ओळखू लागला आहे, त्यामुळे शिरपूर वगळता काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी  मुस्लिम समाज मतदार अभावानेच उभा दिसून आला. शिरपूर पालिकेचा अपवाद वगळता खान्देशात काँग्रेस मुक्तीचे भाजप स्वप्न पूर्ण झाले आहे.