जळगावात भाजप नेते एकनाथ खडसे - मंत्री गिरीश महाजन गट आमने-सामने
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजप मधील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटामधील दुरावा पुन्हा एकदा समोर आला.
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या शेवटच्या सभेत सत्ताधारी भाजप मधील माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गटामधील दुरावा पुन्हा एकदा समोर आला.
महाजन यांच्या जामनेर या मतदार संघातील पंचायत समितीन बी ओ टी तत्वावर बांधलेल्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीसाठी ९ लाख देण्याचा ठरावाला भाजपच्याच खडसे गटातील सदस्यानी विरोध केल्याने हा ठराव सर्वानुमते रद्द ठरवण्यात आला.
नियमाला धरून हा ठराव नसल्याच सांगत ठरावाला खडसे गटाने विरोध केला. विशेष म्हणजे जलसंपदा गिरीश महाजन यांच्या गटाच्या जिल्हा परिषदेच्या प्रयाग कोळी या अध्यक्षा आहेत.
जिल्हा परिषदेच्या पुढच्या वर्षी निवडणूक असल्याने आचारसंहिता केव्हाही लागेल म्हणून आज जळगाव जिल्हा परिषदेची ही शेवट सभा होती. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागून होत. त्यात खडसे आणि महाजन गटातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.