अमरावती : आमदार रवी राणा यांच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारच्या दरम्यान हल्ला केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी, रवी राणा यांच्या कार्यालयाच्या काचा आणि फर्निचरची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर, राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राणी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले... त्यामुळे, पोलीस स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण होतं.


आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा वाद


अमरावती शहरातील भीम टेकडी परिसरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी परवानगी देण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाने तांत्रिक बाबी पुढे करीत पुतळा अनावरणाची परवानगी नाकारली होती. मात्र, या पुतळा अनावरण प्रकरणात पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी खोडा निर्माण केल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. सरकारची परवानगी नसतानाही आमदार रवी राणा आणि त्यांच्या समर्थकांनी पुतळ्याचे अनावरण केले. राणा यांनी खुलेआम केलेल्या भाषणात राज्याचे मंत्री प्रवीण पोटे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता.