औरंगाबादच्या महापौरपदाचा उमेदवार ठरला
औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
औरंगबाद : औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शुक्रवारी मुंबईत भाजपची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला.
भाजपकडून 2 नगरसेवकांनी महापौरपदासाठी जोरदार लॉबींग केलं होतं. अखेर यात भगवान घडामोडे यांनी बाजी मारलीय असं म्हणावं लागेल. घडामोडे यांनी महापौर पदासाठी फॉर्म भरला आहे. यावेळी शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. शिवसेनेनं उपमहापौर पदासाठी आधीच नाव जाहीर केलंय त्यामुळे दोन्ही पक्षाचं संख्याबळ पाहता निवडणुकीमध्ये फारशी चुरस नसेल.