नागपूर : नागपूरमध्येही भाजपच्या नाराज उमेदवारांनी गडकरींच्या घराबाहेर जोरदार घोषणाबाजी केलीय. भाजपची उमेदवार यादी जाहीर करायला बराच वेळ लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडकरींच्या घरी कालपासून त्यासाठी सुरू असलेली बैठक संपली, त्यानंतर उमेदवारी यादी जाहीर होताच नाराज इच्छुकांनी गडकरी वाड्याबाहेर गर्दी करत घोषणाबाजी केली. 


तसंच नागपूर -प्रभाग 22 मधून श्रीकांत आगलावे यांना तिकीट नाकारण्यात आलंय. त्याचा निषेध म्हणून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय. नागपूरमध्ये विविध ठिकाणी भाजप कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतायत.