ठाणे : मुंबई महापालिकेने काळ्या यादीत टाकलेल्या काही ठेकेदारांची कामे ठाण्यातही सुरु असल्याचं उघडकीस आले आहे. त्यांच्या कामाबाबत, स्थायी समिती आणि महासभेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधकांनी देखील आवाज उठविला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही नगरसेवकांनी तर या ठेकेदारांनी केलेली कामे कशी निकृष्ठ दर्जाची आहेत, याचा पुरावा देखील सादर केला आहे. तर काही ठेकेदारांनी आपल्या निर्धारीत वेळेत काम पूर्ण न केल्याचा ठपकाही या ठेकेदारांवर ठेवण्यात आला आहे. 


विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपांवरुन या ठिकाणांची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्यात..  पोखरण रोड नंबर २ येथे रस्त्याच्या कामात विटा आणि मातीचा वापर केला जात असून भविष्यात हा रस्ता कितपत टिकावू ठरेल याबाबत आतापासूनच शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. 


तर घोडबंदरच्या पादचारी पुलाचे काम रखडेलेले आहे, तसेच आनंद नगर येथील पादचारी पुलाचा लोकार्पण सोहळा जरी पार पडला असला तरी, या पुलाचे कामही अर्धवट टाकून ठेकेदाराने पळ काढल्याची बाब समोर आली आहे.