रिसॉर्टमध्ये कँम्पसाठी आलेल्या मुलाचा बुडून मृत्यू
एका मुलाचा जवळच्या बंधा-यात बुडून मृत्यू झाला. 13 वर्षीय मनन गोगारी पोहायला गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं बोललं जातंय.
पालघर : जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील सजन नेचर ट्रेल्स या रिसॉर्टमध्ये कँम्पसाठी आलेल्या एका मुलाचा जवळच्या बंधा-यात बुडून मृत्यू झाला. 13 वर्षीय मनन गोगारी पोहायला गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाल्याचं बोललं जातंय.
मुंबईतील विक्रोळी येथून पिकनिक करिता 50 जण या रिसॉर्टमध्ये आले होते. त्यानंतर रिसॉर्टची टीम यातील काही जणांना जवळच असलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी घेऊन गेले असता ही घटना घडली. तब्बल 12 तासानंतर पोलिसांना मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आलं.
दरम्यान विक्रमगड पोलीस ठाण्यात या प्रकरणी रिसॉर्टच्या व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.