वर्धा : प्रेमाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ही वर्धा येथे घडली आहे. प्रियकरानं घरात घुसून प्रेयसीच्या आई-वडीलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना वर्ध्यात घडली आहे. 


आरोपी पंकज टिकोनवार आज पहाटे प्रेयसीच्या घरात घुसला. त्यानं आपल्या प्रेयसीची आई रेखा भांडेकर आणि पांडुरंग भांडेकर यांच्यावर वार केले. यात रेखा यांचा ग्रामीण रुग्णालय तर पांडुरंग यांचा नागपुरला नेलं जात असताना मृत्यू झाला. या हल्ल्यात त्याची प्रेयसी आणि तिची आजीही जखमी झाल्यात. आरोपी टिकोनवार याला कारंजा पोलिसांनी अटक केली आहे.