100 रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पोलिसाला नागपुरात निलंबीत
शंभर रुपयाची लाच स्वीकारणा-या पोलिसाला नागपुरात निलंबीत करण्यात आले आहे.
नागपूर : शंभर रुपयाची लाच स्वीकारणा-या पोलिसाला नागपुरात निलंबीत करण्यात आले आहे.
लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे निलंबन झाले. धनराज ठोंबरे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
तो अजनी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. काही पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभे राहून वाहनचालकांना चिरीमिरीसाठी त्रास देतात. २० जानेवारीला अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील हनुमाननगर बास्केटबाँल मैदानाजवळ एका पोलीस कर्मचाऱ्यांची वसुली मोहीम सुरु होती.
एका दुचाकी चालकाला त्याने थांबवले व कागदपत्रांची विचारणा करू लागला. वाहनचालकाने पैशाचे पाकीट काढून शंभराची नोट धनराज ठोंबरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातात देताच ठोंबरे याने त्या वाहनचालकाला सोडून दिले.
हा संपूर्ण घटनाक्रम एका मोबाईल धारकाने मोबाईलमध्ये कैद केल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाला. प्रकरणाची गंभीर दाखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी करून पोलीस कर्मचारी धनराज ठोंबरे याला निलंबित केले.