रत्नागिरी : चिपळूणच्या लोटे परशुराम एमआयडीसीत गॅस गळती झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन ऑक्झालेट कंपनीतून ब्रोमिन नावाच्या गॅसमुळं नागरिक हैराण झाले. मुंबई-गोवा महामार्गाच्या बाजुलाच असलेल्या या कंपनीतून बुधवारी संध्याकाळी गॅस गळती सुरू झाली. 


त्यामुळे हायवेवरून वाहन चालवणाऱ्या चालकांना देखील श्वसनाचा त्रास सुरू झाला. या गॅस गळतीमुळे लोटे परिसरातील नागरिक चांगलेच त्रस्त झालेत. इथल्या नागरिकांना श्वाशोश्वास घेण्यास भयंकर त्रास होत होता.


संपूर्ण लोटे एमआयडीसी परिसर हा पूर्णपणे या ब्रोमीन नावाच्या या लाल कलरच्या गॅसच्या विळख्यात सापडला होता. काही दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या सांडपाणीच्या चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचं लिकेज झाला होतं. त्यावेळी नागरिक आक्रमक होत त्यांनी पूर्णपणे सांडपाणी बंद करायला लावलं होतं आता एमआयडीसीत गॅस गळती सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा नागरिक आक्रमक झाले आहेत.