सांगली : काश्मीरमधल्या माछिल सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले शूर जवान नितीन कोळी यांचं पार्थिव दुधगावमध्ये दाखल झालंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीएसएफच्या जवानांनी श्रीनगरमध्ये नितीन कोळींना आदरांजली वाहिली. तिरंग्यात लपेटलेल्या नितीन कोळींच्या मृतदेहाला अखेरचा निरोप देताना बीएसएफ जवानांनी मातृभूमीचा जयजयकार केला.


नितीन यांचं पार्थिव पुणे विमानतळावर आल्यानंतर आदरांजली वाहण्यात आली. दुधगावमध्ये नितीन कोळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.