चंद्रपूर : चंद्रपूर शहरात नंदी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला रेड्यांची झुंज होते. एकीकडे गायी-बैलांना सजवून त्यांना गोड-धोड खाऊ घातलं जातं, तर हा अमानुष खेळही खेळला जातो. शर्यतीवर लाखोंच्या पैजा लागतात. अवघ्या काही तासात रेड्याचे मालक मालामाल होऊन परतही जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे सगळे गुपचूप होतं. ठरलेल्या जागी ठरलेल्या वेळी शेकडो लोक इथं जमतात. रेड्यांच्या मालकांपासून ते बघ्यांपर्यंत, ते थेट झुंजींवर पैसे लावणाऱ्या जुगाऱ्यांपर्यंत. मात्र नेमकी पोलिसांना मात्र या गोष्टीची खबर कधीच नसते.


हा प्रकार गेल्या अनेक पिढ्यांपासून आहे. मात्र इथं येणारे लोक रेड्यांना  होणा-या जखमा आणि जुगार याकडे दुर्लक्ष करून ही केवळ निखळ करमणूक असल्याचा अजब युक्तीवाद करतात.