नंदुरबार : नंदुरबारमध्ये प्रवासी बस आणि जीपची समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आष्टे गावाजवळ नाशिक-नंदुरबार (जय मल्हार ) बस आणि प्रवाशी जीप यांची समोरासमोर धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की एकाचा या अपघातात जागीच मृत्यू झाला तर १७ प्रवासी गंभीर जखमी झालेत. 


अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.