नागपूर : धावत्या बसने अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची एकच तारांबळ उडाली मात्र सुदैवाने या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली नाही... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या बुटीबोरी येथून नागपूरमार्गे येणाऱ्या स्टार बस मधून धूर येत असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले...ज्यानंतर ड्रायव्हरने डोंगरगाव नजीक बस तात्काळ थांबविली.


बसमधील प्रवासी देखील खाली उतरले आणि आग विझवण्याच्या प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात न येता आणखी वाढली... अग्निशमन दलाला घटनेची सूचना देण्यात आली... अग्निशमन दलाच्या एका गाडीने घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोवर बस मोठ्या प्रमाणात जळाली.. इंजिन मधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.