जुन्नर : पुणे नाशिक महामार्गावर आळेफाटाजवळ व-हाडाच्या बसनं पेट घेतला. मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधल्या 50 प्रवाशांचे प्राण वाचले. नारायणगावमधून इंदुरला लग्नासाठी ही बस निघाली होती. ही आग सुमारे 2 तासांनंतर विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. ही बस मात्र जळून खाक झाली.