मुंबई : केंद्र शासनानं परिवहन विषयक सेवा शुल्कात वाढ केल्यानं वाहन चालक मालक संघटनांनी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळं या वाढीचा विचार करावा यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलं आहे.


केंद्र शासनाशी संपर्क साधला असून नियोजित संप मागे घेण्याची विनंतीही त्यांनी संघटनांना केली आहे.