कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारमध्ये असणारे रोज इशारे देतात, धमक्या देतात. सरकार अस्थिर असल्याची भाषा केली जाते. हे थांबवायचं असेल तर भाजपचे 170 आमदार निवडून आणा, असं आवाहन चंद्रकांत पाटल यांनी कोल्हापुरात भाजपच्या मेळाव्यात बोलताना केले. तर घटक पक्षांना भीती घालू नका असं आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी भाजपला दिलंय. 


दरम्यान, जीएसटीबाबत शिवसेनेने आपली भूमिका अचानक बदलल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या दारात भिकेचा कटोरा घेऊन जावे लागणार असेल तर, पाठिंब्याबाबत पूर्नविचार करावा लागेल, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी हा इशारा दिलाय.


लोकसभेमध्ये GSTच्या विधेयकांना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. मात्र राज्याच्या विधानसभेत पाठिंबा देण्याची वेळ आली असताना महापालिकांच्या स्वायत्ततेचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.