चंद्रपूर : चंद्रपूर पालिका निवडणुकांची अद्याप घोषणाही झालेली नाही. असं असताना चंद्रपूर काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आलाय. देश आणि राज्यात पीछेहाट झालेला काँग्रेस पक्ष चंद्रपूरमध्येही एकसंध नसल्याचं पुढे आलंय. दोन दिवसांपूर्वी चंद्रपुरात काँग्रेसचे नेते शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीत पक्षाचा मेळावा घेण्यात आला. 


आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुलाखती आणि तिकीटवाटपासाठी हा अधिकृत मेळावा नसल्याचं सांगत काँग्रेस विधिमंडळ गट उपनेते विजय वडेट्टीवार यांनी मेळाव्यातली हवाच काढली. याशिवाय भाजपला मदत करणा-या अकरा वादग्रस्त नगरसेवकांना तिकिटं मिळणार असल्याचं सांगत वडेट्टीवारांनी काँग्रेसच्या दुस-या गटाला जोरदार धक्का दिला.