10 दिवसांनी सुट्टीवर येणार होते पण नियतीला ते मान्य नव्हते
उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये. चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत
सातारा : उरी येथील लष्करी मुख्यालयावर झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी या गांवचे सुपुत्र चंद्रकांत शंकर गलांडे शहीद झाल्याने त्याच्या जाशी या मूळ गावी शोककळा पसरलीये. चंद्रकांत यांच्या पार्थिवाची वाट त्याची पत्नी २ लहान मिले,आई,वडील व गावकरी पाहतायत
माण तालुक्यातील दुष्काळी भागातील अतिशय दुर्गम समजल्या जाणाऱ्या जाशी येथील चंद्रकांत हे ४ वर्षा पुर्वी सैन्यदलात दाखल झाले. चंद्रकांत याच्या पश्चात त्याची पत्नी निशा व दोन मुले श्रेयश(वय ५) व जय (वय ३) ही आहेत.
घरची दोन एकर जिरायत जमीन पण पाणी नाही. आपल्या तिन्ही मुलानी सॆन्यदलात जावुन देशसेवा करावी अशी शंकर गलांडे यांची इच्छा होती तीच इच्छा तिनही मुलानी पूर्ण केली. आपला मुलगा देशाच्या कामी आल्याचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया वडील शंकर गलंडे यानी झी मिडियावर व्यक्त केली.
चंद्रकांत हा सर्वात लहान यामुळे सर्वांचा आवडता. आपल्या घराबरोबर चंद्रकांत हा जाशी गावातील प्रत्येक सामाजिक घडामोडीत आघाडीवर होता. जाशी आणि परिसरातील त्याचा मित्र समूह मोठा होता. आपल्या गावातील लाडक्या सुपुत्राला गमविल्याची वेदना ग्रामस्थांना व मित्रांना आहे तर देशासाठी आमच्या भुमीपुत्राने आहुती दिल्याचा अभिमान देखील त्यानी व्यक्त केला.
चंद्रकांत दोन महिन्यापुर्वी जाशी येथे आले होते. सामाजिक कामाबरोबर ते शेतीमध्ये देखील काम करुन नवनवीन प्रयोग राबवत होते. १० दिवसानी ते सुट्टीवर येणार होते तसे शनिवारी त्यांनी पत्नी निशा याना फोनवर सांगितले होते पण नियतीला ते मान्य नव्हते. रविवारी बेसावध असलेल्या चंद्रकांत यांच्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आणि त्यात ते शहीद झाले.
त्याचे पार्थिक आज रात्री पुणे येथे येऊन उदया दुपारपर्यंत जाशी येथे आल्यानंतर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.