नागपूर : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर हे जागतिक विक्रमासाठी सज्ज झालेत. शुक्रवारपासून त्यांचा विक्रमाचा प्रयत्न सुरु झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअर्सच्या सभागृहात विष्णू मनोहर यांनी सलग 52 तास पाककृती तयार करण्याच्या विक्रमाला सुरुवात केलीय. या 52 तासात विष्णू मनोहर एक हजार पाककृती तयार करणार आहेत. यात 90 टक्के देशी तर 10 टक्के परदेशी पाककृतींचा समावेश आहे.. मात्र हे सर्व पदार्थ शाकाहारी राहतील हे विशेष.. 


या 52 तासाच्या काळात मनोहर यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ. पिनाक दंदे यांची टीम दिवस रात्र त्यांच्या सोबत आहे. यापूर्वीचा सतत 40 तास पाककृती बनवण्याच्या विक्रम अमेरिकेच्या बेन्झामीन पेरी यांच्या नावावर आहे.. 2014 साली पेरी यांनी 40 तास नॉनस्टॉप कुकिंग केले होते.