नाशिक : महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दोन दिवसापूर्वी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जेजे रुग्णालयात जाऊन भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणात विविध चर्चना उधान आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  प्रफुल्ल पटेल यांनी मात्र या भेटीवर टीका केली आहे. नाशिकमध्ये पुरस्कार वितरणाच्या एका कार्यक्रमासाठी आले असता ते माध्यमांशी बोलत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्यांच्या नेत्यांमुळे आणि सरकारमुळे भुजबळांचे हाल बेहाल झालेत त्या सरकारच्या मंत्र्यांची भेट म्हणजे मगरीचे अश्रू असल्याची टीका  प्रफुल्ल पटेल यांनी केली. बेहिशोबी मालमत्तेसह सर्व आरोपातून भुजबळ निर्दोष सुटतील आणि पुन्हा एकदा ओबीसीं समाजचे नेतृत्व करतील असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. 


मराठा समाजाला सवलती देण्यसाठी आघाडी सरकारने प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे सरकारला सवलती देता आल्या नाहीत, असा बचाव करत सध्याच्या सरकारने सर्वानाबरोबर घेऊन त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे, अशी मागणी  प्रफुल्ल पटेल यांनी केली.