नाशिक : जिल्ह्यात सध्या युती सोडून सर्वच पक्ष फुटीच्या उंबरठयावर आहेत. सिन्नर तालुक्यात राष्ट्रवादीला आता पदाधिकारी उरलेला नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाविरोधात टांगती तलवार असून भुजबळ समर्थक सैरभर झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले हे उदय सांगळे..भुजबळांचे खंदे समर्थक असलेले सांगळे यांनी जिल्हा परिषदेचे आठ सदस्य आणि सहा नगरसेवकांसह शिवबंधन स्विकारलंय. गेल्या काळात जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच सूत्रे स्विकारल्याने भुजबळ विरोधक चांगलेच अडचणीत आले आहेत. पक्षातील गटतट वाढल्याने सर्वजण मातोश्रीवर शरण गेले आहेत  


छगन भुजबळ सध्या गजाआड आहेत. त्यामुळे भुजबळ समर्थकांत घबराट पसरली आहे.  भाजपा आणि सेनेत जाण्यासाठी प्रत्येक जण उंबरठ्यावर असल्याने पक्षनिष्ठा असलेले सैरभैर झालेत. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत धुसफुस सुरु झालीय. एकमेकांविरोधात तक्रारी वाढल्या आहेत. कोणीच कोणाचं ऐकत नाही अशी स्थिती आहे. 


सिन्नरमध्ये पक्षाला आता नेताच न उरल्याने निरीक्षक जितेंद्र आव्हाडांनी तातडीने कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी पक्षातील अनेक तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या.  माध्यमांशी अधिक न बोलता त्यानी बांधकाम मंत्री गेले त्यांचे ठेकेदारही गेले अशी सूचक प्रतिक्रिया व्यक्त केली. 


येत्या काळात महापलिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती वगळता सर्वच पक्षात अस्वस्थता आहे. मोदी प्रभाव ओसरत असल्याने सेनेत प्रवेश करण्यासाठी रीघ लागलीय.