अखिलेश हळवे, नागपूर : एकीकडे चायनीज फूडची क्रेझ वाढतेय. मात्र हेच चायनीज फूड आजारालाही निमंत्रण होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनीही याला विधानसभेत दुजोरा दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चायनीज पदार्थातील अजिनोमोटो हा घटक त्यासाठी कारणीभूत असल्याचं उघड होत आहे. अनेक शहरात या अशा चायनीजच्या गाड्या गल्लोगल्ली दिसून येतील. स्वस्तात मिळणाऱ्या या चविष्ट पदार्थांची भूरळ अनेकांना पडते. मात्र याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय, असा खुलासा खुद्द राज्य सरकारने केलाय. 


चायनीज फूडमध्ये अजिनोमोटो किंना मोनो सोडियम ग्लुटामाईट म्हणजेच एमएसजी नावाचा पदार्थ मिसळला जातो. या पदार्थाच्या सेवनाने मायग्रेनसारखा आजार होण्याची शक्यता वाढते. एकट्य़ा नागपूरमध्ये मायग्रेनचे ३ लाख ६० हजार रुग्ण असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत दिली. 


हा पदार्थ ज्या पाकिटात विकला जातो त्यावर याच्या वापरासंबंधी नियम लिहिलेले असणं बंधनकारक आहे. अजिनोमोटोच्या अति-सेवनाने होणारे गंभीर आजार बघता उघडपणे चाय़नीज पदार्थ विकणा-यांवर निर्बंध आणणं गरजेचं आहे.