`पार्टटाईम` भोंदूबाजी करणाऱ्या सिगरेटवाल्या बाबाला अटक
`सिगरेटवाला बाबा` म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय.
नागपूर : 'सिगरेटवाला बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका भोंदूबाबाला नागपूरमध्ये अटक करण्यात आलीय.
अमरावती रोड स्थित वाडी भागातील म्हाडा कॉलनीत या भोंदूबाबाला अटक करण्यात आलीय. या बाबाविरुद्ध 'ड्रग्स अॅन्ड मॅजिक रेमेडिज अॅक्ट'च्या कलम ५ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भोंदूबाबाचा फुलटाईम जॉब
या भोंदूबाबाची उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हा बाबा फुलटाईम बाबा नाही... तर तो आठवड्याचे सहा दिवस एका औषध बनविणाऱ्या कंपनीत फुलटाईम जॉब करतो... रविवारी मात्र तो म्हाडा कॉलनीतल्या आपल्या नातेवाईकांच्या घरात दरबार भरवतो. शेगावचे श्री गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, ताजुद्दीनबाबा, स्वामी समर्थ यांना जनकल्याणासाठी आपणच भूतलावर पाठविल्याचा दावा करतो.
अंनिसनं दाखल केली तक्रार...
अंधश्रद्धा निर्मुलन समितीनं तक्रार दाखल केल्यानंतर या बाबावर कारवाई करण्यात आलीय.
काही समस्यांचा सामना करणाऱ्या पीडित महल निवासी नरेश नमाजे या बाबाकडे गेले होते. त्यांना बाबानं काही तंत्र-मंत्र दिले... पण नरेसला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. त्यानंतर त्यांनी अंनिसशी संपर्क साधला.
पोलिओग्रस्त बाबा
उल्लेखनीय म्हणजे, हा सिगरेटवाला बाबा स्वत: पोलिओग्रस्त आहे. त्यानं आपल्या पत्नीला सोडलंय. या बाबाकडून गांजा, चिलम, सिगारेटची पाकिटं आणि सेक्सची काही औषधं जप्त करण्यात आलीत.