नागपूर :  रस्त्यावर मात्र आता प्रदूषण-मुक्त बस धावणार आहेत. नागपूर महानगर पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पात पुढच्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इथेनॉलवर धावणाऱ्या २५ बस प्रवाशांच्या सेवेत असतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टप्प्या-टप्प्याने एकूण २३५ बस नागपूरच्या रस्त्यावर धावणार आहेत. त्यामुळे नागपूरकरांचा प्रवास `प्रदूषण-मुक्त' होणार आहे..संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या बसमध्ये CCTV कॅमेरा, आपत्कालीन दरवाजा, अग्नीशमन यंत्र असा विविध सुविधा आहेत.


 गेली दोन वर्षे या बसेस प्रायोगीक तत्वावर शहरात चालवण्यात आल्या.. त्यात यश आल्यानं बसेसची संख्या वाढवण्याचा विचार केला..