रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांची तोफ धडाडणार आहे. कोकणातील तीन जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री कोकण दौऱ्यावर आहेत. कोकणातील पहिली सभा सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये तर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होईल.


कुडाळमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे राणे यांना शहदेण्याचा मुख्यमंत्र्याचा हा प्रयत्न आहे. मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपविरोधात रान उडविले आहे. त्यामुळे शिवसेनेला त्यांच्याच बालेकिल्ल्यात जाऊन टीका करण्याची संधी मुख्यमंत्री आज साधणार आहेत. ते काय बोलतात, याकडे लक्ष लागले आहे.