मुख्यमंत्र्यांनी वळविला जिल्हा परिषदेकडे मोर्चा...
आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली.
औरंगाबाद : आतापर्यंत मुंबईतल्या महापालिकेच्या रणधुमाळीत व्यस्त असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच भाग म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिन गावात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतली.
यावेळी बोलताना आपल्या सरकारनं गाव दुष्काळमुक्त केल्याचा दावा, मुख्यमंत्र्यांनी केला. तर जलयुक्त शिवारमुळे 4 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. शेतक-यांना लवकरच सोलर एनर्जी पुरवू. त्या माध्यमातून 24 तास शेतक-यांना वीज मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली. तसंच जागतिक बँकेनं दिलेलं 5 हजार कोटींचं कर्ज, आपण शेतक-यांसाठी खर्च करणार असल्याचं ते म्हणाले.
तर हिंगोलीतही मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली. औंढा नागनाथ तालुक्यातल्या जवळा बाजार इथे मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी माजी खासदार शिवाजीराव माने यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शेतीची उत्पादकता वाढवणं गरजेचं असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याकरता महाराष्ट्र सरकार एक अभिनव उपक्रम राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.