मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये फूल पँटमध्ये संघाचं संचलन
स्थापनेपासून तब्बल्ल नऊ दशकं उलटल्यावर आज विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्तानं संघाच्या गणवेशात अमूलाग्र बदल प्रत्यक्षात आलाय.
नागपूर : स्थापनेपासून तब्बल्ल नऊ दशकं उलटल्यावर आज विजयादशमीच्या उत्सवाच्या निमित्तानं संघाच्या गणवेशात अमूलाग्र बदल प्रत्यक्षात आलाय.
आज नागपूरात सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून संघाच्या विजयदशमी उत्सवाला सुरूवात झालीय. संपूर्ण नव्या गणवेशात शेकडो स्वयंसेवक आज रेशमीबागेतल्या पथसंचलनात सामील झाले.
पंतप्रधान मोदींनीही स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्यात.
दरवर्षीप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नव्या गणवेशात संघ मुख्यालयात हजर आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सगळे महत्वाचे पदाधिकारी मंचावर आहेत.