निफाडमध्ये हुडहुडी, पारा 7.8 अंश सेल्सियसवर
राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे.
नाशिक : राज्यभरातच थंडीचा कडका वाढत चालला आहे, मात्र नाशिक जिल्ह्यातल्या निफाडमध्ये सर्वाधिक थंडी आहे. निफाडमध्ये आज 7 पॉईंट 8 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातला पारा सातत्यानं घसरतच आहे. थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. त्यामुळे पहाटे आल्हादक गुलाबी थंडीचा आस्वाद, नाशिककर सध्या अनुभवत आहेत.