पुणे : गेल्या 2 दिवसात पुण्याच्या किमान तापमानात घट झाली असून थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरलेली आहे. दुपारच्यावेळी उन्हाचा चटका जाणवत असला तरी संध्याकाळ नंतर चांगलीच थंडी अनुभवायला मिळती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यामध्ये आज पहाटे 8.9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली. काल देखील पुण्याचे तापमान 8.3 अंश सेल्सिअस होते. 


भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील एक दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. त्याचवेळी वातावरण ढगाळ होण्यास सुरूवात झाली असुन पुढील दोन दिवसात शहराच्या तापमानात वाढ अपेक्षीत आहे. 


गुरूवार पर्यंत पारा 16 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल दरम्य़ान 14 आणी 15 डिसेंबर रोजी पुणे आणि परिसरात काही ठिकाणी हलक्या पावसाची शकयता देखील वर्तवण्यात आलेली आहे.