नाशिक : राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढतच चालला आहे. काही ठिकाणी पारा 7 अंशाच्याही खाली आलाय. नाशिकमध्ये पारा 7.3 अंशावर आहे तर निफाडचं तापमान 5 अंशावर आलंय. अहमदनगर आणि जळगावमध्ये मध्ये पारा 8 अंशावर स्थिरावलाय.


अकोल्यातला पारा 11.8 अँशांवर स्थिरावलाय. त्यामुळं स्वेटर, शाल, मफलरसह शेकोटीचाही लोक आधार घेताना दिसतायत. सकाळच्या वेळी फिरायला निघणारे लोक ठिकठिकाणी वाफाळत्या चहाचा आधार घेतायत.