ठाणे : शहरातील घोडबंदर रोडवरील आर मॉल आणि रुनवाल इस्टेटदरम्यान असलेली संरक्षित भींत कोसळून लगतच उभ्या करण्यात ९ गाड्यांचा चक्काचूर झाला. मुसळधार पावसामुळे ही भींत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे.


अलिशान कारवर भींतीचा मोठा भाग कोसळला. त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली या कार दबल्या गेल्यात. मातीचा ढिगारा काढण्यासाठी आप्तकालीन विभागाने क्रेनचा वापर केला. घटनास्थळी फायर ब्रिगेडचे अधिकारी पोहोचले.