नवी मुंबई : नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पत्र लिहिलं आहे. तुम्ही कोणतेही धोरणात्मक घेऊ नका, असे त्यात म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अविश्वासदर्शक ठराव मांडल्यामुळे यापुढे कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामुळे आपण कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, अशा सूचना महापौरांनी पत्राद्वारे आयुक्तांना केल्या आहेत. अन्यथा पुढली जबाबदारी आपली राहील असा इशाराही महापौरांनी दिला आहे.


महापौरांनी सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक बोलावली. त्यानंतर महापौरांनी  आयुक्त मुंढे यांना पत्र लिहिलं. सोबतच पालिका अधिका-यांनाही पत्र लिहून, आयुक्तांकडे कोणतीही फाईल पाठवू नये अशा सूचना केल्या. तसंच त्याचं उल्लंघन झाल्यास त्याकरता अधिकारी जबाबदार राहतील असा इशाराही दिला.