पुणे : पुणे विद्यापीठातही कुलगुरूंविरोधात कुरबुरी सुरू झाल्या आहेत. सजग नागरिक मंचाने कुलगुरूंविरोधात आघाडी उघडली आहे. सजग नागरिक मंचाचे आरोप वासुदेव गाडेंनी फेटाळलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विद्यापीठाचे कुलगुरू वासुदेव गाडे यांनी पदावर नियुक्त होण्यापूर्वी चुकीची माहिती दिली होती असा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. 


विद्यापीठाचे कुलपती म्हणजे राज्यपालांकडे दिलेल्या बायोडेटातली माहिती चुकीची असल्याचा सजग नागरिक मंचाचा आरोप आहे. माहिती अधिकाराअंतर्गत काढलेल्या माहितीवरून वासुदेव गाडे यांचा खोटेपणा उघड झालाय असं सजग नागरिक मंचाचं म्हणणं आहे. 


दिल्ली विद्यापीठात सात वर्षे असोसिएटेड प्रोफेसर असल्याचं वासुदेव गाडे यांनी त्यांच्या बायोडेटामध्ये म्हटलंय. पण प्रत्यक्षात त्यांनी व्हीजिटींग फॅकल्यी म्हणून काम केलंय


वासुदेव गाडे यांनी अनेक प्रोजेक्ट केल्याचं बायोडेटात आहे. पण त्यांनी केवळ एकच प्रोजेक्ट केला आहे. बाकीचे प्रोजेक्ट खोटे असल्याचं माहिती अधिकारात स्पष्ट झालंय. 


सीएसआयआरच्या आयजीआयबीमध्ये विभागप्रमुख होते असं गाडे यांनी बायोडेटात म्हटलंय. पण त्यांच्याकडे असा कुठलाही चार्ज नव्हता असं बागुल यांनी म्हटलंय. 


नऊ विद्यार्थ्यांनी वासुदेव गाडे यांच्याकडे पीएचडी केली असं गाडे यांनी म्हटलंय. पण गाडे हे पीएचडीच्या केवळ दोन विद्यार्थ्यांना को गाईड होते असं माहिती अधिकारात समोर आलंय. 


खोटी माहिती देऊन वासुदेव गाडे यांनी पुणे विद्यापीठाचं कुलगुरूपद मिळवल्याचा आरोप सजग नागरिक मंचाने केलाय. त्यामुळे त्यांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी सजग नागरिक मंचाने केलीय.