पुणे :  पुणे विद्यापीठामध्ये कंत्राट पध्दतीने काम करणा-या सुरक्षा कर्मचा-यांना नियमित करावे या प्रमुख मागणीसाठी सुरक्षा रक्षक आंदोलन सुरक्षा रक्षक संघर्ष कृती समितीच्यावतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन करण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे विद्यापीठामध्ये 94 हून अधिक सुरक्षा कर्मचारी कार्यरत होते मात्र संबधीत कंत्राटदाराचं करार संपल्याने विद्यापीठाने दुस-या कंपनी सोबत करार केला. नवीन कंत्राटदाराने जुन्या सुरक्षा कर्मचा-यांपैकी अवघ्या 33 लोकांना कामावर घेतल्यान  उरलेल्या कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहा चा प्रश्न निर्माण झाला आहे.


काढलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना कामावर रुजू करुन घ्यावे आणि सर्वच सुरक्षा रक्षकांना नियमीत करावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.