कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड :  पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तारूढ भाजप आणि राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. एकदा उदघाटन झालेल्या विकास कामांचं भाजपनं पुन्हा उद्घाटन केल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे. नेमकी ही लढाई काय आहे...पाहूयात या रिपोर्टमधूनच...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पिंपरी चिंचवडच्या संभाजीनगर इथं महापालिकेनं लाखो रुपये खर्च करून जलतरण तलाव बांधलाय ...हा जलतरण तलाव राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांच्या प्रभागा अंतर्गत असल्यामुळे तलावाचं उदघाटन २१ डिसेंबरला राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. होते ... परंतु महापालिकेकडं या तलावाची देखरेख करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नसल्यानं हा तलाव बंद ठेवल्याप्रकरणी मंगला कदम यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केलीय. तर, दुसरीकडे भाजपचा लोकार्पण सोहळा सुरू असताना राष्ट्रवादीचनं काळे झेंडे दाखवत विरोध नोंदवला. 


सत्तेत आल्यानंतर भाजपनं अनेक विकासकामांच्या उदघाटनांचा सपाटा लावला...त्यातलाच एक संभाजीनगरचा जलतरण तलाव. मात्र राष्ट्रवादीनं काम अर्धवट असतानाही या तलावाचं उद्घाटन केल्याचा आरोप, स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे यांनी केला.
 
 विकासकामांच्या श्रेयवादात विजय मात्र जनतेचाच झाला असं म्हणावं लागेल. कारण, जलतरण सर्वसामान्यांसाठी खुला झाला आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडच्या सौंदर्यात भर पडलीय असं म्हणायला हरकत नाही.