बारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण

बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.
पुणे : बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या भव्य स्टेडियचे लोकर्पण करण्यात आले. यावेळी स्टेडियमवर मोठ्याप्रमाणात गर्दी दिसून आली. यावेळी मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा रणजी खेळांडूचा टवेंटी २० सामनाही खेळला गेला.
या कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी बारामतीकरांनी मोठी गर्दी होती. दरम्यान, स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर काही प्रमाणात चेंगराचेंगरी देखील पाहायला मिळाली. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर या खेळाडूंना पाहण्यासाठी ही गर्दी झाली होती.