यवतमाळ : यवतमाळचा कुख्यात गुन्हेगार प्रवीण दिवटे याचा गोळ्या झाडून निर्घृण खून करण्यात आला आहे. यवतमाळ सह विदर्भात गुन्हेगारी वर्तुळामध्ये दबदबा ठेवणाऱ्या कुख्यात प्रवीणच्या खुनामुळे पोलीस विभागासह गुन्हेगारी क्षेत्र हादरले आहे. यवतमाळ मध्ये कमालीचा तणाव आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवीण दिवटे काँग्रेसचा माजी नगरसेवक असून त्याची पत्नी काँग्रेसकडून विद्यमान नगरसेवक आहे. प्रवीण च्या शिरावर खुनाचे अनेक गुन्हे असून ४ दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. गुंठा राऊत अपहरण आणि खून प्रकरणात त्याची न्यायालयाने निर्दोष सुटका केली होती.


स्वतःच्या खासगी सुरक्षेच्या घेऱ्यात राहणाऱ्या प्रवीण दिवटेला सकाळी प्रतिस्पर्धी गॅंगने बेसावध क्षणी गाठले. त्याच्यावर मिरची पूड फेकून, धारदार शास्त्राने घाव घालून आणि गोळ्या झाडून प्रवीण चा निर्घृण खून करण्यात आला. दरम्यान शहरातील एका मोठ्या टोळीच्या म्होरक्याचा अंत झाल्याने शहरातील टोळीयुद्ध भडकण्याच्या शक्यतेने पोलिसांपुढील आव्हान वाढले आहे.