पैसे न मिळाल्याने बँक कर्मचाऱ्यांना कोंडले
५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.
मालेगाव : ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालेगावात घडला.
जुन्या नोटा बदल्यासाठी मालेगावच्या मुशावरत चौकात असलेल्या जनता बँकेने नागरिकांना टोकन दिले होते. मात्र तासांतास रांगेत उभे राहून पैसे न मिळाल्याने नागरिक संतप्त झाले. त्यांनी बँकेला घेराव घालून चक्क बँक कर्मचाऱ्यांना कोंडूंन ठेवले.