लातूर : राज्यात सर्वत्र मराठा मूक मोर्च्याने वातावरण ढवळून निघालेले असताना लातूरला दलित समाजच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्ही.एस.पँथर युवा संघटनेच्यावतीने या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात दलितांसह मुस्लिम धर्मियातील तरुणांनाही हजेरी लावली होती. 


या मोर्च्याला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. कोपर्डी प्रकरणातील आरोपीना फाशी द्यावी, ऍट्रॉसिटी कायद्यांची कडक अंलबजावणी करावी, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, दलित समाजावर होणाऱ्या अत्याचारमुळे स्वरक्षणासाठी विनाअट शस्त्र परवाना देण्यात याव्यात अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.  


दरम्यान हा मोर्चा मराठा समाजाच्या विरोधात नसून याला कुणीही प्रतिमोर्चा ही समजू नये असेही आयोजकांनी स्पष्ट केलंय.