रत्नागिरी : दापोलीत धक्कादायक बाब उघड झालेय. एरव्ही राजकीय निवडणुकांमध्ये होणारे घोटाळे आता साहित्यिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीची मतपत्रिका थेट मतदारांपर्यंत जाणं अपेक्षित असताना त्रयस्थ व्यक्तीमार्फत या मतपत्रिका मतदारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. दापोलीतल्या शाखेत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.


दापोली शाखेतील मतपत्रिका पोस्टाने मतदारांना मिळणं अपेक्षित होतं. मात्र त्या पोस्टाने न मिळाता त्या परस्पर मतदारांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. एकाच व्यक्तीने या मतपत्रिका पोस्टातून परस्पर काढून घेण्यात आल्याचा आरोप दापोली शाखेचे अध्यक्ष कैलास गांधी आणि डॉ. प्रशांत शेंबेकर यांनी केलाय.


येत्या शनिवारी या मदतांना शेवटचा दिवस आहे मात्र अद्यापही मतपत्रिकाच मतदारांना मिळाल्या नसतील तर मतदान करायचं कसं असा सवाल मतदार विचार आहेत. दरम्यान साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांनी याविषयी बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय. 


या मतपत्रिका काढल्याचा प्रकार उघड झाल्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष, प्रमुख कार्यवाहक, कोषाध्यक्ष आणि विभागवार प्रतिनिधींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.


मतपत्रिका टाकण्याचा शेवटचा दिवस याच आठवड्यातील शनिवारी आहे. मात्र मतपत्रिकाच परपस्पर काढून घेतल्यामुळे बोगस मतदान होणार होईल. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया रद्द करून नवीन मतपत्रिका पोस्टाने पाठवाव्यात अशी मागणी सध्या मतदार करत आहेत. मसपा दापोली शाखेच्यावतीने यासंदर्भात निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे.