पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड मधलं राजकीय वातावरण आता चांगलंच गढूळ झालंय... खासकरून गेल्या दोन तीन दिवसात भाजप राष्ट्रवादीच्या संघर्षाने शहरात राजकारण पातळी सोडून होतंय की काय अशी शक्यता निर्माण झालीय...!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसन मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत भाजपने राष्ट्रवादी विरोधात मोर्चा काढला...त्यामुळं संतापलेल्या राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार पलटवार केला. हा मोर्चा म्हणजे लबाड आणि टग्यांचा मोर्चा असल्याची जहरी टीका राष्ट्रवादीने केली. एकीकडे राष्ट्रवादी भ्रष्टाचारी म्हणता आणि राष्ट्रवादीच्याच लोकांना प्रवेश देता असं कसं, भाजप मध्ये ते काय पवित्र होतात का असा सवाल  करत  राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश बेहल यांनी भाजपला घेरले..


राष्ट्रवादीने केलेल्या या टीकेने बावचळलेल्या भाजपनही जोरदार पलटवार केलाय... योगेश बेहल म्हणजे राजकारणातले शक्ती कपूर असल्याची टीका करत ते खलनायकी प्रवृत्तीचे असल्याचा पलटवार भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर यांनी केला आहे. 


राजकारण म्हंटल की आरोप प्रत्यारोप होणारचं...पण हे आरोप प्रत्यारोप करताना राजकीय नेत्यांनी थोडंसं भान ही राखायला हवं. नाही तर आरोप प्रत्यारोपांचा संघर्ष वैयक्तिक संघर्षात बदलण्याची शक्यता ही नाकारता येत नाही...!