नोटाबंदीनं नक्षलवाद्यांचं कंबरडं मोडलं
हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.
गडचिरोली : हजार आणि पाचशेच्या नोटा बंदीचा फटका नक्षलवादी संघटनांनाही मोठ्या प्रमाणात बसलाय.
राज्यातील गडचिरोली आणि देशातील इतर नक्षल-प्रभावित भागांमध्ये नक्षलवादी संघटनांनी मोठ्या प्रमाणात खंडणी मार्फत गोळा केलेला पैसा जंगलात लपवून ठेवलाय. पण, लपवून ठेवलेला हा पैसा बाहेर काढून तो चलनात आणणं या संघटनांना सोपं नसल्यानं पैशांअभावी नक्षलवादी संघटनांचं कंबरडं मोडणार आहे.
कशी असते या पैशांची मोडस ऑपरेंडी...
व्यापारी आणि ठेकेदारांकडून खंडणी मार्फत नक्षलवाद्यांना हा पैसा मिळत असतो. नक्षली संघटनेतील वरिष्ठ या पैशांचं नियोजन करतात आणि ठराविक रक्कम खालील पातळीवर पाठवतात.
हा पैसा शहरी भागात सक्रिय असलेल्या नक्षली संघटनांना देखील पुरवला जातो. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक न करता, अश्या प्रकारे एकत्र केलेला पैसे जंगलात लपवून ठेवले जातात ज्याची माहिती एक-दोन जणांनाच असते. मात्र, चलनातून ५०० आणि हजाराच्या नोटा बाद केल्याने हा लपून ठेवलेला सारा पैसा वाया जाणार आहे.