यवतमाळमध्ये देशी कट्टे येतात कुठून?
यवतमाळातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले आहेत.
यवतमाळ : यवतमाळातील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असून गुन्हेगारांच्या टोळ्यातील सदस्य आता अग्निशस्त्रांचा वापर करू लागले आहेत. शहर आणि वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दोन युवकांकडे देशी रिव्हॉल्व्हर कट्टा आढळून आल्याने ही गंभीर बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे.
बसस्थानक चौक परिसरात कंबरेला देशी कट्टा लावून मंथन अनिल लहाडके हा युवक फिरत असल्याची माहिती वडगाव रोड पोलिस ठाण्यातील डीबी पथकाला मिळाली. त्यावरून मंथन ला ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरेला देशी कट्टा आढळून आला आणि पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतूस मिळाली.