केंद्रानंतर राज्यातही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे
केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे.
मुंबई : केंद्राबरोबरच राज्यामध्येही मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागले आहेत. राज्यातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार दहा जुलैपूर्वी करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम रूप देण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल झाले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट होण्याची शक्यता आहे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची वेळही मागितली आहे.
राज्यात आणखी 12 मंत्री पदे भरली जाऊ शकतात. राज्यात भाजप 12 पैकी 2 मंत्रिपद रिकामी ठेवून शिवसेनेच्या वाट्याला दोन राज्यमंत्री पदं येणार आहेत. सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना विस्तारत संधी मिळणार हे निश्चित आहे.