परळीत पुन्हा धनंजय मुंडे वि पंकजा मुंडे
परळीत पुन्हा एकदा भावाबहिणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. परळी बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेंकांसमोर उभे ठाकलेत.
परळी : परळीत पुन्हा एकदा भावाबहिणीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे. परळी बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे एकमेंकांसमोर उभे ठाकलेत.
बाजार समितीच्या 18 जागांसाठी मतदान पार पडलं. हमाल मापाडी, व्यापारी, सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायत या मतदारसंघात ही निवडणूक पार पडली. धनंजय यांच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीवर वर्चस्व मिळवण्यासाठी पंकजा आणि त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांनी यांनी जोर लावलाय. तर धनंजय मुंडेंनी समिती आपल्याकडे राखण्यासाठी एकाकी लढत दिली.
सेवा सोसायटी आणि ग्रामपंचायतच्या अनेक मतदारांना पंकजा मुंडे यांनी सहलीवर नेलं होतं. हे मतदार थेट मतदानासाठी केंद्रावर पोहचल्याने निकाल धनंजय मुंडेंसाठी धक्कादायक लागण्याची चिन्हं आहेत.
या निवडणुकीचा निकाल सोमवारी लागणार आहे. राज्याला परिचित भावाबहिणीतील शीतयुद्ध पुन्हा एकदा या बाजारसमितीमुळे समोर येणार आहे. जिल्हा परिषदेवर अल्पमतात असतानाही धनंजय यांच्यावर कुरघोडी करण्यात यश मिळवणा-या पंकजा पुन्हा यशस्वी होतात का हे सोमवारी स्पष्ट होईल.