नाशिक : उंची 8 फूट 1 इंच... कुर्ता  शिवण्यासाठी दहा मीटरचा कपडा... 20 नंबरची चप्पल आणि झोपण्यासाठी नऊ बाय सहा फूटाचा बेड... ही ओळख आहे उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्यातल्या धर्मेंद्र प्रताप सिंह याची... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या हा धर्मेंद्र नाशिककरांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालाय. घरची परिस्थिती बेताची असल्याने देशभर भ्रमंती करुन धर्मेंद्र स्वतःचं प्रदर्शन भरवत असतो. असंच प्रदर्शन त्यानं नाशिकच्या आनंद मेळ्यात भरवलंय. 


त्याला पाहण्यासाठी इथं 10 रुपये तिकीट तर सोबत फोटो काढायचा असल्यास 20 रुपये तिकीट ठेवण्यात आलंय. त्यामुळं नाशिककरांची झुंबड उडालीय. लोकांकडून इतकं प्रेम मिळत असलं तरी धर्मेंद्रला प्रतीक्षा आहे ती त्याच्या उंचीच्या जवळपास जाणा-या मुलीची.... 


नाशिककरसुद्धा धर्मेंद्रसोबत मनसोक्त आनंद घेतायत. 10-20 रुपयांत धर्मेंद्रसारख्या उंच व्यक्तीसोबत सेल्फी,फोटो काढण्याची मजा ते लुटतायत.. 


आनंद मेळ्यात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला धर्मेंद्र प्रतापसिंह आपल्या उंचीची गिनीज बुकात नोंद व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे. या उंचीचं कौतुक होत असलं तरी त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामनाही करावा लागतोय. मात्र या सर्वावर मात करुन सकारात्मक दृष्टीकोन ठेवून तो आपलं जीवन जगतोय. त्याच्याकडून प्रत्येकानं एवढी प्रेरणा घेतली तरी आयुष्यातील दुःख काही अंशी नक्कीच कमी होतील..